वाशिंग्टन : भारतावर अधिक कर लादण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी खरी करुन दाखवली आहे. ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. अमेरिकेने भारतावर एकूण 50 टक्के कर लादला आहे. गेल्या आठवड्यातच ट्रम्प प्रशासनाने भारताकडून होणा-या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लागू केलाय. याशिवाय लष्करी उपकरणं आणि ऊर्जा खरेदीबाबत अतिरिक्त दंड लावण्याचीही घोषणा केली होती.
भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे आणि ते खुल्या बाजारात फायदेशीरपणे विकत आहे असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळे तीळपापड झालेल्या ट्रम्प यांही हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार, हा कर 21 दिवसांच्या आत लागू होईल, म्हणजेच 27 ऑगस्ट 2025 पासून, तो भारतातून अमेरिकेत पाठवलेल्या वस्तूंवर लागू होईल. तथापि, या तारखेपूर्वी निघून 17 सप्टेंबर 2025 पूर्वी अमेरिकेत पोहोचलेल्या वस्तूंना या शुल्कातून सूट दिली जाईल. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की हा कर इतर सर्व शुल्क आणि करांव्यतिरिक्त असेल आणि काही विशेष प्रकरणांमध्ये सूट देखील दिली जाऊ शकते. भारतावर लादण्यात आलेला टॅरिफचा फक्त व्यापार संबंधावरच नव्हे, तर जागतिक राजकारणावरही परिणाम होणार आहे.
Comments are closed.