पंचवटी/एनजीएन नेटवर्क
ब्रह्म शक्तीच्या ऐक्याचे प्रदर्शन झाले हे समाज विकासाला अत्यंत उपयुक्त असून समस्त समाजासोबत ब्राह्मण समाज साखरे सारखा राहात असल्याचे प्रतिपादन डॉ अतुल वडगावकर यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या मासिक कार्यक्रमात डॉ. वडगावकर बोलत होते. याप्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील ब्राह्मण संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ अतुल वडगावकर, विशेष अतिथी मनपा अभियंता उदय धर्माधिकारी आणि संस्था पदाधिकारी यांनी दीपप्रज्वलन करून ,भारतमाता , भगवान परशुराम, महर्षी याज्ञवल्क्य यांचे प्रतिमांचे पूजन केले. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत संस्था बांधकाम समिती प्रमुख दिलीप शुक्ल यांनी केले. प्रास्ताविक संस्था कार्यवाह अॅड.भानुदास शौचे यांनी केले. सत्कारमूर्तींच्या यादीचे वाचन सुवर्ण महोत्सव समिती सदस्य सुहास भणगे यांनी केले. ब्राह्मण संस्थांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह यांचा सत्कार डॉ अतुल वडगावकर यांचे हस्ते करण्यात आला. आभार संस्था उपाध्यक्ष अनिल देशपांडे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ रोहिणी कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी ब्राह्मण महासंघ अध्यक्ष भगवंत पाठक , गायरान ट्रस्ट अध्यक्ष मोहन रानडे , ऋग्वेदी संस्था अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी , सकल छननात ब्राह्मण संस्था अध्यक्ष एस जी जोशी यांनी सत्काराला उत्तर देऊन हा समाज संघटन व समाज विकासाला उपयुक्त कार्यक्रम असल्याचे सांगून शुयमा ब्राह्मण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला शुभेच्छा दिल्या , शुयमा ब्राह्मण संस्था नाशिक , तसेच इंदिरानगर येथील पदाधिकारी तसेच शहर व जिह्यातील ब्राह्मण संस्थांचे पदाधिकारी , यासह सतीश शुक्ल , ऍड भानुदास शौचे, उदयकुमार मुंगी, श्रीमती मालती कुरूंभट्टी, चंद्रशेखर गायधनी, दिलीप शुक्ल, धनंजय पुजारी,राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, रविंद्र देव, के .पी.कुलकर्णी,प्रमोद मुळे,उदय जोशी, अनिल नादुर्डीकर, सतिश जोशी, डॉ.शरद कुलकर्णी, निखिल देशपांडे,राजेश दिमोठे, श्रीकाचंन पंचाक्षरी, रामकृष्ण उपासनी, सुनिल पुजारी,रोहीणी जोशी, सुहास भणगे, सौ.अनिता कुलकर्णी, सौ.शांता जाधव, गजानन जाधव उपस्थित होते.