नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
येत्या ७२ तासांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदे दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला एक मंत्रीपद तर, अजित पवार गटाला एक मंत्रीपद दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
शिंदे गटाकडून भावना गवळी, गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे तर पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची चर्चा आहे.
सध्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदे आहेत. या चारपैकी दोन मंत्र्यांना मंत्रिपदे गमवावी लागणार आहेत. ते कोण आहेत, ते अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु, या दोघांना राजीनामा देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती आहे.