मुंबई/एनजीएन नेटवर्क
मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडले, ते सहकुटुंब हॉलिडे इनमध्ये राहायला गेले होते. मात्र, बाळासाहेबांना तयार करून मी स्वत: उद्धव ठाकरे यांना घेऊन घरी घेऊन आलो, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात राणे यांनी हा दावा केला आहे. अवधूत गुप्ते यांनी नारायण राणे यांना बोचरे प्रश्न विचारले. त्यावर नारायण राणे यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. उद्धव ठाकरे बाळासाहेबांना एकच धमकी द्यायचे, घर सोडायची, असेही राणे यावेळी म्हणाले. मी शिवसेनेत असतो तर आता ठाकरे यांची झालेली वाईट अवस्था झाली नसती. 40 सोडा पण एक आमदार इकडचा तिकडे जाऊ दिला नसता, असा दावाही राणी यांनी केला. हे माझं पाप आहे, संजय राऊत यांना खासदार मी केला. तेव्हा खासदार झाले नसते, नाहीतर ते कधीच झाले नसते, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.