नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष कला शाखेसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यूजीसी च्या नियमांना अनुसरून उदबोधन वर्गाची सुरुवात नुकतीच करण्यात आली.
यादरम्यानच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या अनेक वेगवेगळ्या विषयासंबंधीचे मार्गदर्शन तसेच भविष्यामध्ये असणाऱ्या संधी आणि मुलांना सह शैक्षणिक अनेक उपक्रमांची माहिती महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक आणि कार्यरत प्राध्यापकांनी दिली. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ,राष्ट्रीय छात्र सेना, सी .बी .सी .एस. प्रणाली, परीक्षा पद्धती अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये कला शाखेमध्ये नव्याने प्रवेश घेणारे विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख आणि उद्बोधन वर्गाचे संयोजक प्रा.सिताराम निकम यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कुशारे यांचे मार्गदर्शन लाभले आणि हा सहादिवशीय उद्बोधन वर्ग संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील आय .क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर पवार, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ.मिलिंद थोरात, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविराज वटणे आणि इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रम सहा दिवस उत्साहात पार पडला.