मुंबई : मुख्यमंत्री पदावर असताना शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेले काम, सर्वसामान्यासाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना, प्रामुख्याने लाडकी बहिण योजना या कार्याने प्रेरित होऊन नाशिक मनपा उबाठा गटाच्या आजी माजी नगरसेवक नगरसेविका यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.
शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिक्षणमंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे, शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिन संजय मोरे, राम रेपाळे, उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उपनेते विजय करंजकर, मा. खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तागीरी निवासस्थान, मुंबई येथे नाशिक महानगर पालिका सिडको विभागातील उबाठा गटाच्या नगरसेविका युवतीसेना उपजिल्हाप्रमुख किरण बाळा दराडे, व सातपूर विभागाच्या नगरसेविका महिला बालकल्याण, विधी समिती या समित्यांच्या माध्यमातून काम केलेय सीमा गोकुळ निगळ तसेच नाशिक मनपा माजी सभापती नाशिकरोड माजी नगरसेवक पुजाराम गामने, पुंडलिक अरिंगळे, गोकुळ निगळ यांनी भगवा झेंडा खाण्यावर घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. या प्रसंगी लोकसभा संघटक योगेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी, नगरसेवक दिपक दातीर, शाम खोले, नितीन खर्जुल, दिगंबर नाडे आदी उपस्थित होते.
अजय बोरस्ते यांच्यासह १२ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत नाशिक महानगर पालिकेतील मनसे व कॉंग्रेस पक्षातून प्रत्येकी एक, राष्ट्रवादी पक्षातून दोन, उबाठा गटाचे ७ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेनेची एकूण नगरसेवकांची संख्या २५ झाली तर माजी नगरसेवकांची संख्या १० असे एकूण ३५ नगरसेवक नगरसेविका शिवसेना पक्षाचे झाले. असून आगामी काळात होणाऱ्या प्रवेशांमुळे हि संख्या ५० हून अधिक होऊ शकते अशी माहिती शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.
२०१७ च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील ३५ पैकी १९ नगरसेवक शिवसेनेत ४ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला तर ३ नगरसेवक दिवंगत झाले . उबाठाच्या गटात आत फक्त ९ नगरसेवक शिल्लक असून येणाऱ्या काळात यातील बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेत सामील होती