NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

दोन ट्रॅव्हल्स बस समोरासमोर धडकल्या; ६ प्रवाशांचा मृत्यू , अनेक जखमी

0

बुलढाणा/एनजीएन नेटवर्क

जिल्ह्यातील मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहावर भीषण झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स बस समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावर घडली. 

प्राप्त माहितीनुसार, एक बस अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर 25 ते 30 प्रवाशी असलेल्या दुसरी ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स बस समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.