NGN News
Latest Marathi News

‘केटीएचएम’च्या दर्शन, तेजस यांची आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या बोट क्लबचे खेळाडू दर्शन गवळी व तेजस गडदे यांची जर्मनीमध्ये होणाऱ्या FISU World University Games Rhine-Ruhr 2025 या आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे दोन्ही खेळाडू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

ही आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धा २७ जुलै २०२५ रोजी ड्यूसबर्ग (Duisburg), जर्मनी येथे होणार आहे. अंतिम फेरीसाठी संपूर्ण देशातून निवड झालेल्या अत्यंत मोजक्या खेळाडूंमध्ये दर्शन व तेजस यांचा समावेश होणे ही महाविद्यालयासाठी तसेच नाशिक शहरासाठी गौरवाची बाब आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल दर्शन व तेजस यांचे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती मा. बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. विलास देशमुख, प्रा. डी. डी. जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. अजित मोरे, प्रा. के. एस. शिंदे, प्रा. शशिकांत मोगल, महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ. एस. एस. काळे, क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी व बोट क्लब सेक्रेटरी डॉ. योगेश गांगुर्डे यांनी अभिनंदन केले.

या यशस्वी खेळाडूंना रोईंग प्रशिक्षक समाधान गवळी, आप्पा पिंगळे, जितेंद्र कर्डीले, सचिन भंबारे, सचिन दळवी, विलास लोखंडे आणि दौलत बेंडकोळी यांनी मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय निवडीमुळे केटीएचएम महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या, क्रीडाक्षेत्रात अभिमानास्पद ठसा उमटवला आहे.

Comments are closed.