श्रीनगर : एनजीएन न्यूज नेटवर्क
सुरक्षा दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत सोमवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. तीन दहशतवाद्यांमध्ये सुलेमान शाहची ओळख पटली आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमानचा सहभाग होता. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारले होते. यात एक काश्मिरी नागरिक सहभागी होता. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारले.
गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला करणारे दहशतवादी मात्र सैन्याच्या हातातून निसटले होते. दरम्यान, आता याच हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या दहशतवाद्यांसदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यासाठी सैन्याने ऑपरेशन महादेव राबवले आहे. या ऑपरेशनमध्ये एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेतला जात होता. एप्रिल महिन्यापासून भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होते. शेवटी आता भारताच्या शूर सैनिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुसा सुलेमानी हा दहशतवादी पहलगामच्या हल्ल्यात सहभागी होता. त्यालाही ठार करण्यात आले आहे.
Comments are closed.