नाशिक रोड जवळ शनिवारी रात्रीची घटना
नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबईहून रकसोल ( बिहार ) कडे मार्गक्रमण करणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे तीन युवक नाशिक रोड जवळ खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झला असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री हा अपघात झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ( एलटीटी ) येथून निघालेली कर्मभूमी एक्स्प्रेस शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान नाशिक रोड जवळ आल्यानंतर ढिकले नगर परिसरात तीन युवक खाली पडले. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेगाडीत गर्दी झाल्याने
Comments are closed.