नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
चेहेडी बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघे बुडाल्याची घटना समोर आली आहे. एकाच परिसरातील दोन मुले बुडाल्याची घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिद्धार्थ संकेत गांगुर्डे, राहुल दीपक महानुभाव, संतोष नामदेव मुकणे आणि आर्यन नंदू जगताप हे चार युवक आंघोळीसाठी गेले होते. त्यापैकी दोघांनी बंधाऱ्यावरुन पाण्याच्या प्रवाहात पूर्वेच्या दिशेला पाण्यात उडी मारली. याचवेळी सिद्धार्थ गांगुर्डे आणि राहुल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले. अशावेळी त्यांनी मदतीसाठी धावा केला. तथापी, काठावरील दोन्ही मित्रांची भंबेरी उडाल्याने त्यांनी घर गाठत घडलेला प्रकार सांगितला. तातडीने नजीकच्या अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आल्यानंतर पथक पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यत शोधमोहीम सुरु होती.