नाशिक/एनजीएन नेटवर्क
गुरुगोविंद सिंग फाउंडेशनच्या गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक 14 व 15 जून रोजी करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची संकल्पना ‘Recent trends in engineering science technology and management’ ( RTETM) असून यामुळे अभियांत्रिकी विज्ञान,तंत्रज्ञान व व्यवस्थापन या क्षेत्रातील अलीकडील संशोधन व विकासात्मक क्रियाकलाप/ उपक्रम या संबंधित देवाण-घेवाण होण्यासाठी तसेच चर्चा होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या परिषदेसाठी विद्यार्थी, प्राध्यापक संशोधक व तंत्रज्ञ यांनी 191 शोधनिबंध प्रस्तुत केले आहेत.परिषदेमुळे अनेक तरुण संशोधकांना नव संशोधनाची चालना मिळेल अशी माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य व परिषदेचे समन्वयक श्रीहरी उपासनी यांनी दिली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक गायत्री जगताप व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सदर परिषदेसाठी गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंग छाब्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष सरदार हरजित सिंग आनंद,सचिव कुलजित सिंग बिर्दी व सर्व विश्वस्त मंडळाने शुभेच्छा दिल्या आहेत.