विंचूर : मच्छिंद्र साळुंके
नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या चादेश्वरी धबधबा परिसरात गुरुवारी एक भीषण अपघात घडला. घाटातील नागमोडी वळणावर आयशर (MH 41 U 8525 / MH 41 BQ 1723) व स्कुटी यांच्यात जोरदार धडक होऊन दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मृत झालेले दोघेही बंधू राहुल बाळू खोडके (वय 25) आणि रोहित बाळू खोडके हे मूळचे गर्दनी, तालुका अकोला येथील रहिवासी असून, मागील एक वर्षापासून कासारी येथे वास्तव्यास होते. अपघातात समाधान गोरख मेगाळ हा युवक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तातडीने रुग्णालयात नेल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल साळुंखे यांनी दोन्ही भावांना मृत घोषित केले.
घाटात नेहमीप्रमाणेच वळणांची धोकादायक रचना, वेग आणि वाहनांची काळजी न घेता केलेली वाहतूक यामुळे या अपघाताचे कारण समजले जात आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे
Comments are closed.