NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘टीव्हीएस’द्वारा XX TVS iQube स्कुटर्सच्या किमतींसाठी विशेष उपक्रम

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांची जागतिक पातळीवरील नामांकीत कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने सस्टेनेबल फ्यूचर मोबिलिटी सोल्यूशन्स सादर करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करणे कायम राखले आहे. इलेक्ट्रिक गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याचे भारत सरकारचे व्हिजन आणि इलेक्ट्रिक गतिशीलतेचा स्वीकार जलद गतीने केला जावा यासाठी अनुकूल उपक्रम सादर करण्याचे व देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक इकोसिस्टिम विकसित करण्याचे टीव्हीएस मोटरचे प्रयत्न यांना अनुसरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीचे इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री मनू सक्सेना यांनी सांगितले, “टीव्हीएस मोटर देशात ईव्ही परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे. आपल्या इलेक्ट्रिफिकेशन वाटचालीमध्ये TVS iQubeने मागील आर्थिक वर्षात आपल्या स्कुटर्सच्या श्रेणीमध्ये १,००,००० युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला, या कंपनीच्या आनंदी ग्राहकांच्या समुदायात सातत्याने वाढ होत असल्याचे हे द्योतक आहे.

ग्राहककेंद्री राहण्याच्या टीव्हीएस मोटर्सच्या बांधिलकीला अनुसरून ही कंपनी २० मे २०२३ पर्यंत बुकिंग्स केलेल्या TVS iQube ग्राहकांसाठी लॉयल्टी बेनिफिट प्रोग्राम सादर करणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असणार आहे. फेम २ सबसिडीमध्ये बदल करण्यात आल्यानंतर खर्चाचे ओझे हलके व्हावे यासाठी ही ऑफर सादर करण्यात आली आहे. याशिवाय नवीन ग्राहकांना १ जून २०२३ पासून गाडीच्या बुकिंगवर फेम २ मधील बदलांचे संपूर्ण ओझे घ्यावे न लागता नवीन किमतींचा लाभ घेता येईल. फेम २ बदलानंतर १ जून २०२३ पासून TVS iQubeच्या किमतींमध्ये १७,००० ते २२,००० रुपयांची (गाडीच्या प्रकारानुसार) वाढ होईल. २० मे २०२३ च्या आधी प्री-बुक केलेल्या ग्राहकांना टीव्हीएस मोटर अतिरिक्त लॉयल्टी बेनिफिट देखील देत आहे. याविषयीची तपशीलवार माहिती आमच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.”

१४० शहरांमध्ये उपलब्धता

वाहनांच्या इलेक्ट्रिफिकेशनच्या दिशेने सुरु असलेली टीव्हीएस मोटर कंपनीची ही वाटचाल तीन मूलभूत
तत्त्वांवर आधारित आहे: रेन्ज, कनेक्टेड क्षमता, चार्जर्स आणि रंग याबाबतीत ग्राहकांना आपली
आवडनिवड पूर्ण करता आली पाहिजे; सर्व वर्तमान नियमांचे पालन करून वाहनाच्या सुरक्षिततेबाबत
ग्राहक संपूर्णपणे निश्चिन्त असले पाहिजेत आणि डिलिव्हरीचे वचन पूर्ण करेपर्यंतचा एकंदरीत खरेदी
अनुभव उत्तम असला पाहिजे आणि ऑपरेट करणे सहजसोपे असले पाहिजे व तरीही स्कुटरचा प्रभाव
कमी होता कामा नये. सध्या ही स्कुटर भारतभरातील १४० शहरांमध्ये उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.