NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘राष्ट्रवादी’ला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा : समीर भुजबळ

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सत्तेच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून अनेक विधायक कामे केली. राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण, मंडल आयोगाची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महाविकास आघाडीच्या कालवधीतही अनेक विकासाची कामे आपण केली. आज मात्र देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर व सर्वसमान्य नागरिक अडचणीत आला असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

नाशिक राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २४ वा वर्धापन दिन व रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सरोज आहिरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार अपूर्व हिरे, विष्णूपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, मधुकर मौले, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, समाधान जेजूरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, ऐश्वर्या गायकवाड, दिलीप नलावडे, सुरेश आव्हाड, धनंजय राहणे, मनिष रावल, जगदीश पवार, कविता कर्डक, समिना मेमन, सुषमा पगारे, बाळासाहेब गीते, सुरेख निमसे, मनोहर कोरडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, पवार साहेब काँग्रेस मधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या सोबत सर्वात प्रथम छगन भुजबळ कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले. शरद दिल्लीतून मुंबईत आले त्यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पक्षाचे नाव काय याबाबत दोन दिवस चर्चा झाली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव निश्चित झालं. त्यानंतर १० जून १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. केवळ वीस दिवसाच्या काळात सर्व तयारी केली यामध्ये मी स्वतः नियोजनात होतो. पक्षाचे चिन्ह निर्मिती, झेंडा, घटना निर्मिती तसेच नागरिकांची नोंदणी करण्याबाबत सर्व जबाबदारी आपण पार पाडत होतो. माझगाव येथील सहकाऱ्यांना सोबत घेऊन माझगाव येथून नागरिकांची नोंदणी व इतर आवश्यक कागदपत्रे व दस्ताऐवज तयार करण्यात आले असल्याचे त्यानी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे नोंदणी करत असतांना पक्षाने चरखा या निवडणूक चिन्हाची मागणी केली होती. इथे आयोगाने पक्षाला मान्यता दिली, पण चरखा चिन्ह देण्याची मागणी नाकारली. निवडणूक आयोगाने दुसरं निवडणूक चिन्ह सूचवण्याची सूचना केली. त्यामुळे आता काय ? त्यानंतर घड्याळ या चिन्हाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. पक्षस्थापनेनंतर अवघ्या दोन महिन्या पक्ष सत्तेत आला या आठवणीना त्यांनी उजाळा दिला. तसेच गेली २५ वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा पक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

ते म्हणाले की, सध्या देशात महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. चुकीची माहिती पसरवून महापुरुषांची बदनामी सुरु आहे. देशात आणि राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सूड बुद्धीने कारवाई करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याविरोधात आपल्याला लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार आपल्याला निवडून देऊन पवार साहेबांचे हात अधिक बळकट करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार सरोज आहिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मकरंद सोमवंशी, जीवन रायते, शंकर मोकळ, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ, नदीम शेख, समाधान तिवडे, किरण जगझाप, बाळासाहेब जाधव, प्रशांत खरात, योगेश दिवे, मनोहर बोराडे, शिवाजी भंदुरे, राजेद्न शेळके, आबा आमले, नियमात शेख, नाना पवार, गौतम पगारे, नईम शेख, सुनिल जगताप, राजेश भोसले, सागर लामखेडे, अल्ताफ पठाण, उदय सराफ, साजिद मुलतानी, पूजा आहेर, सचिन पिंगळे, सुलतान शेख, पुष्पा राठोड, अपर्णा खोत, संगीता साळवे, दीप्ती हिरे, संगीता पाटील, मीनाक्षी काकळीज, संगिता गांगुर्डे, अपेक्षा अहिरे, कुंदा शहाणे, डॉ.संदीप चव्हाण, बाळा निगळ, जय कोतवाल, सोनू वायकर, विशाल डोके, निलेश भंदुरे, संजीवनी जाधव, रेश्मा वाजे, योगिता पाटील, रुपाली पठारे, रुपाली तायडे, निर्मला सावंत, सुरेखा पठाडे, रोहिणी महाजन, मंगल मोकळ, संगीत पाटील, अर्चना शिंदे, पुष्पाताई वाघ, मंगला मोरे, संगीता सानप, निशा झनके, संगीता चौधरी, बबिता सोनवणे, रोहिणी रोकडे, वैशाली तायडे, संतोष भुजबळ, विक्रांत डहाळे, संदीप गांगुर्डे, हर्षल चव्हाण, जितेंद्र जाधव, संतोष जगताप, रियान शेख, सुनील घुगे, करण आरोटे, अक्षय पाटील, संदीप खैरे, रोहिणी ठाकरे, वैशाली किल्लेदार, वसुधा दुसाने, माहेश्वरी दुसाने, सुजाता खैरनार, सुनंदा सूर्यवंशी, भरती पगारे, मंगला खांडगे, विजया नेरकर, निधी जाधव, पुष्पा खांडगे, मनिषा पाटील, भारती चित्ते, रेखा शेलार, चंद्रकला बुरडे आदी उपस्थित होते.

गरजू विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

नाशिक शहरात कार्यरत असणाऱ्या ह्युमन बिंग फाऊंडेशनच्या वतीने १२ वीत शिक्षणाऱ्या दोन अनाथ मुलांची शालेय फी भरण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीचे धनादेश माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. याप्रसंगी संजय खैरनार, अकील खान, सोहेल काझी, रामेश्वर साबळे, विनय पांडे, रझा खान, आजम बरकती, अब्दुलनबी खान व ह्युमन बिंग फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.