NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ट्रक चालकांच्या मुलींना शिक्षणासाठी मिळणार महिंद्रा सारथी अभियान शिष्यवृत्ती

0

पुणे/एनजीएन नेटवर्क

महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजन (MTBD) तर्फे या ड्रायव्हर्स डे ला महिंद्रा सारथी अभियानाच्या माध्यमातून ट्रक चालकांच्या मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. प्रकल्प महिंद्रा सारथी अभियान या मुलींच्या उच्च शिक्षणाच्या हक्काचे समर्थन करून त्यांचे जीवन बदलण्यासाठी एक छोटेसे योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

महिंद्रा ही पहिल्या काही व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यापैकी एक आहे जिने या उपक्रमाचा पायंडा पाडला आहे आणि निवडक उमेदवारांना त्यांच्या कामगिरीबद्दल १०,००० रुपयांच्या शिष्यवृत्तीसह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला आहे. हा प्रयत्न महिंद्रा ट्रक आणि बस विभागाच्या ट्रक ड्रायव्हर समुदायाप्रती चालू असलेल्या वचनबद्धतेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. याची सुरुवात२०१४ मध्ये महिंद्रा सारथी अभियानासोबत करण्यात आली होती. संपूर्ण भारतातील ७५ हून अधिक ट्रान्सपोर्ट हब आणि चांगल्या प्रकारे परिभाषित, पारदर्शक आणि स्वतंत्र प्रक्रिया याद्वारे सुरुवातीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आत्तापर्यंत, ८९२८ तरुण मुलींनी या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असून त्यामुळे त्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता येतील.

याप्रसंगी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे कमर्शिअल व्हेईकल्सचे बिझनेस हेड श्री. जलज गुप्ता म्हणाले, “महिंद्रा सारथी अभियान व्यावसायिक वाहन परिसंस्थेतील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठीवचनबद्ध असून ड्रायव्हर समुदायाचे जीवन सुधारणे हे उद्दिष्ट आहे. ट्रक ड्रायव्हर्सच्या मुलींना मोठी स्वप्नेपाहण्याची संधी देण्यासाठी आणि त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांकडे जाण्यासाठी त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा देण्यात आम्हाला आनंद होत आहे. तरुण मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यात प्रभावी भूमिका बजावत असल्यामुळे महिंद्रा सारथी अभियान आमच्या ड्रायव्हर आणि भागीदारांनी उत्साहाने स्वीकारले आहे.”

कंपनीने या शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या प्रत्येक मुलीला १०,००० रुपये थेट बँकेत हस्तांतरित करण्याची आणि या यशाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्याची योजना आखली आहे. महिंद्रा ट्रक आणि बस लीडरशीप इंडिया तर्फे फेब्रुवारी-मार्च २४ मध्ये निवडक ठिकाणी सत्कार आयोजित केला जाईल आणि त्यामध्ये ट्रक चालकांच्या मुलींना ११०० शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.