NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

त्र्यंबकेश्वरला श्रावण सोमवारी पहाटे चार वाजेपासूनच दर्शन सुविधा

0

 त्र्यंबकेश्वर /एनजीएन नेटवर्क

श्रावणात प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे चार वाजताच दर्शनासाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार वगळता इतर दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.

श्रावणात वाढणार्‍या गर्दीचे नियोजन देवस्थानला करावे लागते. रांगेत उभे असलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शन होईल, त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांची गैरसोय होणार नाही, याकडे देवस्थानकडून लक्ष देण्यात येत असते. त्या दृष्टीने अनेक व्यवस्था यंदा देवस्थानकडून मंदिराच्या आवारात करण्यात येत आहेत.दर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळे येऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ पहाटे पाच ते रात्री नऊ अशी करण्यात आली आहे.

स्थानिकांना ओळखपत्र बंधनकारक

त्र्यंबक शहरातील स्थानिकांना मंदिर उघडल्यापासून सकाळी १०वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत दर्शन घेता येईल. स्थानिकांनी दर्शनासाठी येतांना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था तर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.