- पद्मश्री बाबुभाई राठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सूर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मेगा प्रोजेक्टसह मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणून औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल स्थानावर आणण्याचे पद्मश्री बाबुभाई राठी यांनी बघितलेले स्वप्न साकार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा सूर नाशिक इंडस्ट्रीज अँड र्मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बाबुभाई राठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला.
व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, जेएनपीए(मुंबई)चे अधिकृत कस्टम एजंट मच्छिंद्र घाडगे, नाइस चे अध्यक्ष रमेश वैश्य, रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमीचे संस्थापक तुषार चौधरी , निमा माजी अध्यक्ष विवेक गोगटे, मधुकर ब्राह्मणकर, मनीष कोठारी,आयमाचे अध्यक्ष ललित बूब, लघु भारती उद्योगचे अध्यक्ष निखिल तापडिया,चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, राठी परिवाराचे जेष्ठ सदस्य जयप्रकाश राठी, निमा सचिव राजेंद्र अहिरे, श्रेयस राठी,अखिल राठी आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी आपल्या प्रास्ताविकात पद्मश्री कै. बाबुभाई राठी यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले त्याची विस्तृत माहिती दिली. नाईस,निमा,निवेक यांची मुहूर्तमेढ पद्मश्री राठी यांनी रोवल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नाशिककरांच्या हृदयात आगळे स्थान मिळविणारी पंचवटी एक्सप्रेस सुरु करण्यास त्यांनी जे परिश्रम घेतले त्याची आठवणही नहार यांनी करून दिली. निमाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मेगा प्रोजेक्ट आणणे,सीपीआरआय लॅब सुरू करणे,डायपोर्ट प्रकल्पला गती देणे, दीर्घकाळ रेंगाळलेला सीईपीटी प्रकल्प साकारणे आणि नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारणे असे पाच कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी लवकर करण्याचा आमचा मानस असून तीच पद्मश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल असेही नहार यांनी पुढे सांगितले.
कै.बाबुभाई राठी त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. नाशिकला औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ साठाव्या दशकात बाबूभाईनीच रोवली. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ हवेत हे त्यांनी वेळीच ओळखले होते आणि प्राचार्य डॉ. मो.स. गोसावी यांना सांगून त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीला एमबीएचा अभ्यासक्रम सुरू करण्यास भाग पाडले याची आठवण निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांनी आपल्या भाषणात करून दिली. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी कै.बाबुभाई राठी यांनी दिलेले योगदान सर्वांच्या स्मरणात असल्याचे नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य यांनी सांगितले. नाशिकने आज निर्यात क्षेत्रात जी उंच भरारी घेतली आहे त्यामागे कै. बाबुभाई राठी यांचे परिश्रम मोलाचे आहेत असे निमाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी यांनी सांगितले. निमाला एक बळकट औद्योगिक संघटना बनविण्याचे श्रेयस सुद्धा त्यांना जाते, असेही कोठारी पुढे म्हणाले. बाबुभाई राठी यांनी नाशकात उद्योगांची पायाभरणी करण्याबरोबरच नाशिक हे स्वच्छ व सुंदर कसे राहील याकडे विशेष लक्ष पुरविले. नाशिकला केमिकल इंडस्ट्री उभी राहणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली असे निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांनी निदर्शनास आणले. इगतपुरी येथून व्यवसायानिमित्त आम्ही नाशकात आलो व आमची भरभराट झाली यामागे खरी प्रेरणा कै.बाबुभाई राठी यांची असल्याचे आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी गौरवाने नमूद केले. लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया यांनी सुद्धा कै. राठी यांच्या कार्याचा गौरव केला.
कै.बाबुभाई राठी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून निमा व रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकल टू ग्लोबल या व्याख्यानात जेएनपीए(मुंबई)चे अधिकृत कस्टम एजंट मच्छिंद्र घाडगे यांनी उदयोन्मुख निर्यातदारांना मोलाचे मार्गदर्शन केले. निर्यात करताना कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी माहिती देऊन उपस्थितांनी विचारलेला विविध शंकांचे निरसन केले. स्टार्ट अप इंडियाचे श्रीकांत पाटील आणि रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमीचे तुषार चौधरी यांनीही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
निमा उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, प्रमोद वाघ, योगिता आहेर, किरण खाबीया, मिलिंद राजपूत, निवेकचे संदीप भदाणे, नितीन आव्हाड, वैभव नागसेठिया, हेमंत खोंड, एस के नायर, गोविंद झा, संजय राठी, योगेश जोशी, भावेश भन्साळी, रिमी चौहान, नारायण क्षीरसागर, शुभम कंकरेज आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.