नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन हा ‘चालक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी देखील संस्थेच्या वतीने रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ सकाळी १० वाजता लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉल एच पी गुरूनानक पेट्रोल पंपासमोर, डी मार्ट मॉल सर्व्हिस रोड,कोणार्क नगर, आडगाव शिवार,नाशिक येथे चालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनकडून या चालक दिनानिमित्ताने रक्षा बंधन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आय चेकप शिबिर आणि वरिष्ठांकडून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या वतीने २० चालकांसाठी रुपये पाच लाख किमतीचा अपघाती विमा देखील काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त ट्रान्सपोर्ट चालक व चालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र फड,कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केले आहे.