NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

लासलगाव बाजार समितीचे पहिल्या दिवशी ५ कोटींचे व्यवहार ठप्प

0

लासलगाव/राकेश बोरा

केंद्राने लाभलेल्या चाळीस टक्के निधी शुल्क संदर्भात जिल्ह्यातील लासलगाव सह बाजार समिती यांनी जोपर्यंत सदर निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याने एकट्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहे.

जिल्ह्यातील 15 बाजार समिती यांनी 40% निर्यात शुल्क मागे घेण्यासाठी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारला होता त्या पार्श्वभूमीवर सोमवारी  लासलगाव बाजार समितीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब शिरसागर यांना निवेदन देण्यात आले याबाबत बाजार समिती त्यांनी या प्रश्न पाठपुरावा करावा असा निवेदनाचा असे होता यावेळी अध्यक्ष भारत दिघोळे सह केदारनाथ नवले व विजय भोरकडे यांच्यासह सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.   दरम्यान आशिया खंडातील कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता नामदार धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना बाजार समितीचे सभापतींची  तातडीची बैठक मंगळवारी नाशिक येथे आयोजित केली असून त्यांनी तात्काळ केंद्रीय वाणिज्य मंत्री पियष गोयल यांच्याशी यासंदर्भात नामदार धनंजय मुंडे यांनी चर्चा केली असल्याचे समजतेया प्रश्नी तात्काळ लक्ष घालून सोडवण्यासंदर्भात विनंती केली आहे.
.——————-
@ केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करत असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत शेतमाल मिळावा ही सरकारची जबाबदारी आहे तर शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते, औषधे व शेतमालाला योग्य भाव मिळावा ही जबाबदारी कोणाची? कांदा उत्पादकांच्या मतावर निवडून आलेल्या आमदार ,खासदार, मंत्री यांची नेमकी भूमिका काय?

  • योगेश रायते (कांदा उत्पादक,खडक माळेगाव).
लासलगाव बंद बाजार समिती बंद च्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे केदार तसेच निफाड चे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Leave A Reply

Your email address will not be published.