NGN News
Latest Marathi News

‘नाशिक पश्चिम’मधील वाहतूक कोंडी फुटणार; आ. सीमा हिरेंच्या प्रयत्नांना यश

  • ३४२ कोटींची रस्ते विकासकामांना कुंभमेळा प्राधिकरणाची मंजुरी

** डॉ. दिलीप कोठावदे

नवीन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सिंहस्थासाठीचे विकासकामे व्हावीत, यासाठी आ.सीमा हिरे यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्नांना यश आले आहे.आमदार हिरे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून सिहस्थ काळात मतदार संघातील नागरिकांना कोणताही त्रास होवू नये तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या हजारो वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक-त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचे रस्ते विकसित करण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदरची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे.

दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा यावेळी सन २०२७ होणार आहे. कुंभमेळ्यासाठी अवघ्या देशभरातून भाविक नासिकला येणार असल्याने हजारो वाहनांचा आणि लाखोंच्या गर्दीचा शहरावर मोठा भार पडणार आहे.यामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या हजारो वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी आ. सीमा हिरे यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे सततचा पाठपुरावा सुरू केला होता.यातूनच शासनाकडून नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात तिनशे बेचाळीस कोटी रुपयांचे रस्ते विकसित करण्याची कामे मंजूर करण्यात आली असून या कामांना कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे.

या कामांवर प्रशासकीय मोहोर..

प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांमध्ये बारदान फाटा ते सुला वाईन चौक (बाह्य वाहन तळते अंतर्गत वाहनताळ्यांना जोडणारा रस्ता) रस्त्याच्या कामासाठी छप्पन कोटी ८६ लाख,पपया नर्सरी सिग्नल ते एक्सलो जंक्शन (बाह्य वाहनतळ / रेल्वे स्थानक- त्र्यंबकरोड – मुंबई महामार्ग जोडरस्ता) रस्त्याच्या कामासाठी ७७ कोटी ३३ लाख,एक्सलो चौक ते गरवारे चौक (बाह्य वाहनतळ /रेल्वे स्थानक- त्रंबकरोड – मुंबई महामार्ग जोडरस्ता) रस्त्याच्या कामासाठी ७१ कोटी ९९ लाख, लेखानगर – कलानगर चौक- वडाळागाव -रविशंकर मार्ग – विजया ममता चौक या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी ३८ कोटी पन्नास लाख, जेहान सर्कल ते गंगापूर गाव मनपा हद्द पावेतो रस्ता (वाहनतळ रस्ता) विकसित करण्याच्या कामासाठी ४९ कोटी ३५ लाख, आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला मनपा हद्द विकसित करण्यासाठी ४९ कोटी २९ लाख रूपयांच्या कामांचा समावेश आहे.

प्रस्तावित विकासकामे अशी..

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे,सोमेश्वर धबधब्याजवळ उभारण्यात आलेल्या नवीन पूलालगत भ०य- दिव्य घाट आणि स्नान कुंडाची उभारणी करणे,एक्सलो पॉईंट- चुंचाळे -पांजरपोळ मार्गे बेलगाव ढगापर्यत रस्ता तयार करणे,खेतवाणी लॉन्स -त्रिमुर्ती चौक – पाथर्डी फाटा दरम्यानच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे,आंनदवली येथील गुरूजी रूग्णालय ते नवशा गणपती दरम्यान उड्डाणपुलाची निर्मिती करणे, सिडको -सातपूर येथील धोकादायक विजेच्या तारा भूमीगत करणे आदी विकासकामे प्रस्तावित असून सदर विकासकामांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती आ. हिरे यांनी दिली आहे.

Comments are closed.