NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

द्वारका ते नाशिकरोड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘हा’ प्लान..

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

द्वारका ते नाशिकरोड या ७ किलोमीटर अंतरावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी वाहन चालकांच्या डोकेदुखीचा भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर महा-मेट्रोने निओ मेट्रोचा प्रस्ताव तसेच उड्डाणपूलाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ने दिला आहे त्यामुळे दोन्हींची सांगड घालून डबल डेकर फ्लायओव्हर होणे गरजेचे आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र थांबणार आहे. द्वारका सर्कलमध्ये सतत गर्दी होत असते, रेल्वेस्टेशन, पुणे तसेच मुंबई – आग्रा हायवेला जोडणारे हे सर्कल असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच उद्भवत असते.

 पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून ही कोंडी सोडविण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हरची अंतिम मंजुरी तसेच निधी तातडीने मिळून काम सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

सागरमाला प्रकल्पाचा भाग

द्वारका ते नाशिकरोड हा भाग भारत सरकारच्या सागरमाला योजनेत समाविष्ट असून, सागरमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक व्युहात्मक व ग्राहकाभिमुख प्रकल्प आहे, यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. महामेट्रोकडे मेट्रोची अंतिम मंजुरी प्रस्तावित असून डबल डेकर पुलाच्या मंजूरी बाबत नितीन गडकरी यांच्याकडे भुसे यांनी विनंती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.