घोटी/राहुल सुराणा
देशाच्या स्वातंत्र्यापासून इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला सर्वात मोठ्या आकाराच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येते. ही परंपरा आजही अबाधित ठेवण्यात आली असून, ७७ व्या स्वतंत्र दिनी कावनई किल्ल्यावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील कावनई हे गाव स्वातंत्रपूर्व काळात हे तालुक्याचे ठिकाण होते. या गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभल्याने जिल्ह्यात नावारुपास आलेले हे गाव. कपिल मुनीचे वास्तव्य,गजानन महाराज यांचे तपोस्थान आदी धार्मिक वारशाबरोबर जवळील शिवकालीन कावनई किल्ला हा आजही ऐतिहासिक खुणा ठेऊन दिमाखात उभा आहे. १९४७ साली देशात स्वातंत्र्याची मशाल पेटल्यानंतर तत्कालीन शासनाने आदेश काढले की देशातील सर्व ऐतिहासिक किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात यावे.या आदेशाची इगतपुरी महसूल विभागाने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली. आजही या किल्ल्यावर १८ बाय २२ फुट आकाराच्या विशाल राष्ट्रध्वजाचे प्रत्येक स्वातंत्रदिनी आणि प्रजासत्ताक दिनी सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात येते. विशेष म्हणजे हे ध्वजारोहण शासकीय कर्मचाऱ्याच्या हातून करण्याची परंपरा आजही कायम असून,हा ध्वज उतरविल्यानंतर ध्वजाची घडी घालून हा ध्वज तहसील कार्यालयाच्या कोषागारात जमा करण्यात येतो.विशेष म्हणजे सन.१९४७ पासून हा एकच ध्वज ध्वजारोहणासाठी वापरण्यात येत आहे.
७७ व्या स्वतंत्रदिनी कावनई किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहनास तलाठी जयंत धोडपकर , ग्रामसेवक अरविद ठाकरे, कृषी सहाय्यक कोकाटे, ,ग्रामपंचायत सदस्य नंदू शेलार,किरण रायकर,रतन शेलार ,पांढरी बोराडे ,कोतवाल भागाजी कौटे ,किरण पाटील,किरण पाटील राजाराम सिरसाट, ,शिवाजी सिरसाट, तसेच महिला वैशाली लाड,हिमानी लाड,व ग्रामस्थ उपस्थित होते.