पिंपळगाव (ब)/एनजीएन नेटवर्क
टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक झाला असून जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती परिसरात रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो ३०० रुपये पोहोचलेला टोमॅटो ५ रुपयांना विकावा लागणार म्हणून शेतकऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने रोष व्यक्त केला.
प्रारंभी तीन ते चार हजार असा बाजारभाव मिळालेल्या टोमॅटोच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झाली. 20 किलोच्या कॅरेटला अवघा 100 ते 170 रुपये दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीमध्ये टोमॅटो घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समिती आवारातच टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला. मध्यंतरी टोमॅटोमुळे उत्पादकांनी रगड कमाई केल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. आता मात्र कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेला टोमॅटो शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याची स्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांने टोमॅटो विक्रीला आणले असता यावेळी एका 20 किलोच्या कॅरेटला 100 रुपये, किलोला 5 रुपये भाव पुकारल्याने संतप्त होत संबंधित शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकत संताप व्यक्त केला.