मुंबई/एनजीएन नेटवर्क
टॉमेटोच्या किमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री बसतेय. देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही दिवसांत टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे.
टोमॅटोच्या किमतीत सध्याची वाढ ही एक हंगामी बाब आहे आणि यावेळी किमती सामान्यतः जास्त असतात. पुढील 15 दिवसांत किंमती कमी होतील आणि एका महिन्यात सामान्य होईल. देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचा दर 100 रुपये किलोच्या वर राहिला. साधारणत: शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला भाव असतानाही केवळ 300 रुपये प्रति क्रेट भाव मिळतो. सध्या टोमॅटोचा भाव 100 रुपयांच्या पुढे गेला असताना शेतकऱ्यांकडून टोमॅटोचा एक क्रेट एक हजार ते 1400 रुपयांपर्यंत विकला जात आहे.