निफाड/एनजीएन नेटवर्क
मोटार सायकलवरून जाणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निफाड तालुक्यातील शिरवाडे फाटा येथे घडली आहे. हे तीनही तरुण एकाच बाईकवरुन रात्रीच्या सुमारास घरी निघाले होते. त्याचवेळी बसची धडक बसल्याने तिघांचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, सदर घटना मुंबई- महामार्गावरील निफाड तालुक्यातील शिरवाडे फाटा येथे घडली आहे. रात्रीच्या सुमारास हे तरुण आपल्या घरी जात असताना त्यांना बसची धडक बसली. या धडकेत तीनही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही तरुण शिरवाडे वणी या गावातील होते. महेश निफाडे, सुभाष निफाडे, नितीन निफाडे अशा मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. तिघांच्याही मृत्यूने शिरवाडे वणी गावात शोककळा पसरली आहे.