नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे .भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये राष्ट्रीय संगठन महामंत्रिपदाची जबाबदारी बी. एल. संतोष यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सह-संगठन महामंत्रिपदी शिवप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्रिपदी महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.