मनमाड : रस्त्यावर उभ्या दुचाकीला अन्य दुचाकीची धडक देऊन पाडण्याच्या वादातून एका युवकाने धारदार शस्त्राने व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह त्यांचा भाऊ आणि पुतण्यावर हल्ला केल्याची घटना मनमाड मध्ये सोमवारी घडली. या घटनेबाबत व्यापाऱ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल पारिक, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक आणि द्वारकेश पारिक असे हल्ला झालेल्यांची नावे आहेत. किरकोळ वाद झाल्यानंतर अनिल यांनी संबंधिताना विचारणा केल्यानंतर त्याचा राग येवून हल्लेखोरांनी हे कृत्य केले. पोलिसांनी संशयितास अटक केल्यानंतर त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेबाबत व्यापाऱ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला.