NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

धरण पाहू अथवा मरण..देवनाचा सिंचनसाठी आत्मदहनाचा इशारा कायम

0

येवला/एनजीएन नेटवर्क

देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम तातडीने काम सुरू करा, साठवण तलावात पाणी आडवा आणि शेतकऱ्यांना सिंचना साठी उपलब्ध करून द्या , अन्यथा आमचा संयम आता संपला आहे..पाण्याची वाट बघणारे अनेक शेतकरी पाणी न बघताच मयत झाले…पण ना पाणी अडले ना जिरले… जिरली फक्त शेतकऱ्यांची मागणी आणि मेली ती जगण्याची इच्छाशक्ती , इतकी की आता सरकार कडे मागण्या सारखे काही उरले नाही आणि सरकार कडे ही देण्यासाठी काही शिल्लक नाही..इतपत निराशा पदरी आली… आम्ही एक तर आत्मदहन करावे किंवा जेल मध्ये जावे एवढीच सरकारची इच्छा दिसते आहे. तसे नसते तर मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन देऊन एक महिना झाला, पण कोणतीच दखल घेतली गेली नाही, आलेले आंदोलनाचे निवेदन गृह खात्याला पाठवणे एवढीच औपचारिकता केली… 2377 शेतकऱ्यांच्या सह्या असलेल्या आत्मदहन आंदोलनाचा इशारा असलेले निवेदन केराच्या टोपलीत जात असेल तर मुख्यमंत्री कार्यालय नेमके कोणते काम करते आणि या राज्यात संवेदनाहीन सरकार आहे की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे…

देवदरी येथील ‘देवनाचा’ सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही येत्या आषाढी एकदशीला आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, वनमंत्री यांना 23 मे रोजी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर खरवंडी येथे जलसंकीर्तन परिषद झाली… ‘देवनाचा’ सिंचन प्रकल्प झालाच पाहिजे अशा घोषणा संतप्त शेतकऱ्यांनी दिल्या..

सरकार राज्यकर्त्यांची आणि जनकल्याणाची भूमिका विसरले आहे, बळाचा वापर होण्याची शक्यता आहे, पाण्याचे आंदोलन चिरडून टाकण्याची सरकारची मानसिकता दिसून आहे.
आषाढी एकादशीला कुटुंबसह पूजा करणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी जनता हेच आपले कुटुंब आहे याचा विसर पडला आहे , इतकेच नाही तर संताचे विचार माहीत नसलेल्या मुख्यमंत्री यांनी विठ्ठलाची पूजा करू नये
— जगन मोरे, सचिव देवनाचा सिंचन प्रकल्प कृती समिती

..तर मुख्यमंत्री कार्यालय बंद करा : थोरात

जलसंकीर्तन परिषदेत मुख्यमंत्री कार्यालयावर कृती समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बोचरी टीका केली. ‘बळ, बुद्धी, वेचुनिया शक्ती | उदक चालवावे युक्ती || या उक्ती चा सरकार ला विसर पडला आहे….सरकार जनतेसाठी काम करत नसेल तर मुख्यमंत्री कार्यालय बंद करा अशी मागणी थोरात यांनी केली. बळ, बुद्धी आणि शक्ती यांचा वापर जलसंधारणा साठी करायचा असतो या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा सरकारला विसर पडला असून सर्व बळ, बुद्धी आणि शक्ती आंदोलन मोडून काढण्याचा विचार सरकार करत असेल तर आम्हीही आत्मदहनाच्या इशाऱ्या वर ठाम आहोत असा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी या वेळी केला.

मुख्यमंत्री हे स्वतः च जलसंधारण मंत्री असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात एकत्रित बैठक लावण्याची मागणी जलहक्क संघर्ष समितीची मागणी आहे.

‘देवनाचा’ प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील प्रत्यक्ष 358 हेक्टर जमीन उपसा सिंचना द्वारे ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु. रेंडाळे या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे.कायमच अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.हा राज्यस्तरीय प्रकल्प असून आजवर २०१२ नंतर च्या सर्व जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषि , वने , पर्यावरण, या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातून हा विषय गेला आहे , यापुढेही या विविध खात्यांच्या संयुक्त समन्वय साधून प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो . मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे .
खात्यांचे मुख्य सचिव , महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय यांचे मंत्री व सचिव यांनी संयुक्त बैठक घेऊन आपले केंद्रातील मंत्री पद यांच्या प्रभावाने राज्य आणि केंद्र सरकार कडून प्रकल्पास पूर्णपूर्ण करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प :-


एकुण खर्च मान्यता १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३
लाभार्थी गावे :- रहाडी खरवंडी , देवदरी

सिंचन क्षमता – ३५८ हेकटर
उपलब्ध होणारे पाणी ६५.३३ दश लक्ष घनफुट

धरणाची लांबी २२५ मीटर
धरणाची उंची १६. १८ मीटर
सांडव्याची लांबी ९० मी
बुडीत क्षेत्र ५७ हेक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.