NGN News
Latest Marathi News

नशामुक्त भारत संकल्पासाठी हजारो नाशिककर धावले ! ‘नमो युवा रन मॅरेथॉन’ उत्साहात

मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी सहभागी; २० हजार नागरिकांच्या हजेरीचा दावा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेवर आधारीत ‘नमो युवा मॅरेथॉन’ या स्पर्धेला नाशकात उदंड प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यिात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी ( दि. २१ ) त्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो आबालवृद्धांनी नोंदवलेला सहभाग हे या रन चे वैशिष्ट्य ठरले.

आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून या उपक्रमास प्रारंभ झाला. राज्याचे जलसंपदा तहात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ करण्यात आला. आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि मंगेश चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापलिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील केदार, सुनील बच्छाव, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, रश्मी हिरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील डॉक्टर्स, वकील, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, भाजयुमो पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नमो युवा रन मॅरेथॉनमध्ये  सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांच्या वतीने टी-शर्ट देण्यात आल्याने या साम्याने उपक्रमात वेगळाच रंग भरला होता. सहभागी प्रत्येक व्यक्तीला आयोजकांच्या वतीने मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले. या उपक्रमात सुमारे वीस हजार नागरिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

————

@ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात तब्बल २० हजार नागरिक सहभागी झाले. भाजयुमोच्या या उपक्रमाला लाभलेला प्रतिसाद खरोखर वाखाणण्याजोगा राहिला. देशभरातील ७५ शहरांची ‘नमो युवा मॅरेथॉन’ साठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकचा सहभाग राहिला. समाजातील सर्व स्तरांतील आणि सर्व वयोगटातील नागरिकांचा यामध्ये सहभाग राहिला. राज्यातील उपक्रमात नाशिकने संख्यात्मक स्तरावर बाजी मारली. नाशिककरांचे मन:पूर्वक धन्यवाद !

  • सुनील केदार, महानगर जिल्हा अध्यक्ष, भाजप

Comments are closed.