नाशिक/एनजीएन नेटवर्क
21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जागतिक योग दिनाचे 9 वे वर्षे आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध 31 संस्थांना एकत्रित करून अनंत कान्हेरे मैदान येथे सकाळी ६.०० ते ८.०० योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा आनंत कान्हेरे मैदान येथे हजारो नागरिक , महिला पुरुष व लहान मुलं हे पांढरे कपडे घालून या योग दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .यावेळी ‘ओम नमः शिवाय’च्या गाण्यावर काही नागरिकांनी ठेका देखील धरला होता.
नाशिक शहरात विविध संघटना योग क्षेत्रात कार्यरत असून योगाचा प्रसार व प्रचार करीत आहे. त्यांचे योग क्षेत्रातील योगदान महत्वाचे आहे, योग दिनाच्या निमित्ताने या सर्वांना एकत्र करून हा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षक शर्मिला वालावलकर या होत्या. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मोहन कानडे सर यांनी उपस्थित योगसाधकांकडून विविध प्रकारचे योग करून घेतले.
नाशिक शहरात योग क्षेत्रात आदर्शवत काम करणारे योग विद्याधामचे डॉ. विश्वासराव मंडलिक , आर्ट ऑफ लिविंग चे विजय हाके, रिव्ह्यू सायकलींग इंडिया लिमिटेड धन्वंतरी येवला , प्लेमेंट ग्रुप जगदीश पोद्दार, सिद्ध समाधी योग रमेश सानप, तेज फाउंडेशन सीमा कुलकर्णी, हॉट फुलनेस इन्स्टिट्यूट अलका पटेल, श्रीराम सहज योग श्री प्रशांत सर, पतंजली विद्याधाम जयवंत पाटील, जीवन विद्या मिशन जयंत जोशी, महाराष्ट्र योग शिक्षक संघ जीवराम गवाळे सर , निसर्ग योगी निसर्ग उपचार केंद्र नरवडे सर , गीत योग फिटनेस अकॅडमी गीत पटणी, अर्थ फाउंडेशन सोनाली दगडे, सायकल असोसिएशन मोहन देसाई आदी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच योग क्षेत्रातील काम वाढवण्याबाबत व निरोगी आयुष्य जगण्यासंदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन या तज्ञांकडून करण्यात आले.
या कार्यक्रमात योग विद्या धाम ,नाशिक योग विद्या केंद्र ,दि आर्ट ऑफ लिव्हिंग ,सिध्द समाधी योग ,भारतीय योग संस्थान, सहजयोग,पतंजली योग विद्यापीठ ,योग क्रीडा प्रबोधिनी ,महाराष्ट्र योग शिक्षक संघ , जीवन विद्या मिशन, भाजपा योग प्रकोष्ट ,आदि योग केंद्र , तेज फाऊंडेशन ,हार्ट फुलनेस इन्स्टिट्यूट ,रामचन्द्र मिशन ,प्रजापती ब्रम्हाकुमारी , ईशा फाऊंडेशन , जॉगर्स गोल्फ ग्रुप , सावरकर जलतरणळ तलाव स्विमर्स , नाशिक क्रिकेट असोसिएशन , कै. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान मित्र मंडळ , वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स , प्ले मेट ग्रुप , सुर्या अकादमी ,सायक्लीस्ट फाऊंडेशन ,अर्थ फाऊंडेशन , निसर्ग उपचार केंद्र ,गीत योग फीटनेस अकादमी ,मानवता हेल्थ फाऊंडेशन , जागृती ट्रॅक इंटरनेशनल नेचोथेरपी ऑरगनायझेशन योग श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्ट या सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या
यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह माजी आमदार निशिकांत मोगल, भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे, प्रशांत जाधव, अनिल भालेराव, मोहन कानडे , योग गुरु नंदू देसाई, यशवंत निकुळे, प्रदीप पाटील, मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात, स्वाती भामरे, संगीता जाधव, मिर्झा मॅडम, सुनील देसाई, अजिंक्य साने आदि उपस्थित होते.