मुंबई/एनजीएन नेटवर्क
सुप्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड कॅरेटलेन आता टाटा समूहाचा भाग असेल. टाटा समूहाच्या तनिष्क ग्रुपमध्ये हा ब्रँड दाखल झाला आहे. कॅरेटलेनने 27 टक्के हिस्सेदारी विक्री केली होती. टाटा समूहाने कॅरेटलॅन यांच्यामध्ये करार झाला. टाटा समूहाने या कंपनीतील उर्वरीत सर्व हिस्सेदारी खरेदी केली. शनिवारी टायटन कंपनीने कॅरेटलेन कंपनीतील उर्वरीत 27 टक्के हिस्सेदारी खरेदी केली. त्यामुळे ही कंपनी आता टाटा समूहाचा हिस्सा झाली आहे.
टाटा समूहाच्या टायटन कंपनीने ही डील पूर्ण केली. जवळपास 4621 कोटी रुपयांत हा व्यवहार पूर्ण झाला. या कंपनीत पूर्वीपासूनच टायटनची हिस्सेदारी होती. आता या खरेदीमुळे हा ब्रँड पूर्णपणे टायटनचा झाला आहे. कॅरेटलेनचे सीईओ सचेती आणि त्यांच्या कुटुंबियांकडे या कंपनीचे 91,90,327 इक्विटी शेअर होते. पण टायटन कंपनीने हे शेअर खरेदी केले आहे. या खरेदीमुळे कॅरेटलेनचे शोरुम, स्टोअर्स आता टायटनच्या मालकीची झाली आहे.