मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्ला कार आपल्या नातवाला भेट दिली आहे. कार खरेदीमागे सरकारचे पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. मंत्र्यांचे म्हणणे आहे की यामुळे लहान मुलांमध्येही पर्यावरण जागरूकता निर्माण होईल. राज्यातील सरकार या वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यांवर सवलत देत आहे. टेस्ला कारची ही खरेदी पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरात वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे म्हटले जात आहे.
भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. महत्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काऊंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे, अशी माहिती सरनाईकांनी दिली. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असे सरनाईक म्हणाले. दरम्यान, जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते.
टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
Comments are closed.