मुंबई/एनजीएन नेटवर्क
बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी आहे, जिच्यावर एक- दोन नाही तर, तब्बल ७०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिचे नाव आहे कंगना राणावत. कंगना तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. मध्यंतरी तिने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात मोठी विधाने करून देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
कंगना हिच्यावर देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये 700 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर खुद्द अभिनेत्री स्पष्टीकरण दिलं होतं. ‘ही परिस्थिती मला एकटीला सांभाळावी लागणार आहे. शिवाय आगामी सिनेमांची कामे देखील मलाच पहायची आहेत. पण या सर्व गोष्टी एकटीने सांभाळण्याची ताकद माझ्यात नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.