मुंबई/एनजीएन नेटवर्क
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघे अनेकदा पार्ट्यांमध्ये किंवा डिनर डेट किंवा मग लंचवर गेल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते दोघे जिथे असतात तिथे सगळ्याचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात. हृतिक आणि सबा यांच्या लग्नाची चर्चा त्यांच्या रिलेशनशिपविषयी कळल्यापासून सुरु होती. आता ते दोघे त्यांच्या नात्याला एक नाव देण्यासाठी तयार झाल्याचे म्हटले जात आहे.
हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या नव्या अफेअरची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यावर आता त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. आता मीडिया रीपोर्ट्सनुसार हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. हृतिकनेही सबाबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला असं म्हटलं जात आहे. मात्र, हे दोघे कधी आणि कुठे लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बा आझाद आणि हृतिकची भेट एका कॉमेन फ्रेंड द्वारे झाली होती. खरंतर, हृतिक आणि सबाच्या रिलेशनशिपच्या चर्चा तेव्हा सुरु झाल्या जेव्हा त्या दोघांना एकत्र डिनर डेटवर स्पॉट केले होते. सुरुवातीला ते दोघे गोव्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी एकत्र अनेक ट्रीप केल्या.