नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO शशिधर जगदीशन हे आर्थिक वर्षात (2022-23) सर्वाधिक पगार घेणारे बँकर ठरले आहेच. त्यांना तब्बल 10.55 कोटींचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. याशिवाय, शशिधर जगदीशन यांचे सहकारी आणि एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांना गेल्या आर्थिक वर्षात 10 कोटी वार्षिक पगार देण्यात आला आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात जास्त पैसे देणारे दुसरे बँकर आहेत.
शशिधर जगदीशन यांचा एकूण वार्षिक पगार 10.55 कोटी रुपये इतका आहे. यात 2.82 कोटी बेसिक पगार, 3.31 कोटी रुपयांचे भत्ते, 33.92 लाख रुपयांचे पीएफ आणि 3.63 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बोनस यांचा समावेश आहे. सर्वाधिक पगार घेणाऱ्या बँकर्सच्या यादीत अॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा वार्षिक पगार 9.75 कोटी इतका आहे. त्यांच्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे संदीप बक्षी यांना 9.60 कोटी रुपये पगार मिळतो.