मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड पडून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतल्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशातच आता उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
महायुती सरकारच्या उर्वरित होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार नसल्याचं समोर येत आहे. लवकरच होणाऱ्या विस्तारात फक्त शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये मंत्रीपद समान वाटली जाणार असल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या वाट्याला आणखी 7 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.