मुंबई : भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक टाटा एआयए ने संपत्ती निर्माण करण्यासाठी इच्छुक गुंतवणूकदारांसाठी गेल्या काही वर्षात गुंतवणुकीच्या संधी सातत्याने उपलब्ध करवून दिल्या आहेत. टाटा एआयएने अनेक वेगवेगळे विषय घेऊन ८ युनिट लिंक्ड उत्पादनांचा एक प्रभावी सूट विकसित केला आहे. या उत्पादनांनी सातत्याने मापदंडांपेक्षा उत्तम कामगिरी बजावून अनेक वेगवेगळ्या कालावधींमध्ये खूप चांगले लाभ कमावले आहेत.
उत्तम कामगिरी बजावण्याबरोबरीनेच या फंड्सना रेटिंग्स देखील उच्च मिळाले आहेत. जागतिक बेंचमार्क मॉर्निंगस्टार रेटिंग्सने टाटा एआयए लाईफच्या रेटेड एयुएमपैकी ९५.२५% ना ३१ जानेवारी २०२४ रोजी पाच वर्षांमधील कामगिरीच्या आधारे ४ किंवा ५ स्टार रेटिंग दिले आहे. टाटा एआयएचे गुंतवणूक धोरण पॉलिसीधारकांप्रती अतूट बांधिलकी दर्शवते आणि अधिक चांगला, सातत्यपूर्ण, जोखीम समायोजित व दीर्घकालीन परतावा देण्यावर भर देते. सुस्पष्ट संशोधन प्रक्रिया आणि बॉटम-अप स्टॉक-
पिकिंग धोरण स्वीकारून टाटा एआयए ज्यांच्यावर बाजारपेठेतील उतारचढावांचा प्रभाव होत नाही अशा स्थिर व
दृढ गुंतवणूक प्रथांचे पालन करते.
फंड्सच्या कामगिरीमध्ये सुधारणा होत राहावी यासाठी युनिट लिंक्ड योजनांचा एक सेट प्रस्तुत केला आहे, या योजना गुंतवणूकदार खरेदी करू शकतात. यामध्ये फॉर्च्युन प्रो , वेल्थ प्रो , फॉर्च्युन मॅक्सिमा इत्यादी उत्पादने आहेत. हल्लीच टाटा एआयएने परम रक्षक (पीआर) सीरिजअंतर्गत इन्व्हेस्टमेंट लिंक्ड प्लॅन्स नावाची योजना सादर केली आहे. ही अशाप्रकारची अनोखी योजना असून ग्राहक उच्च सुरक्षा कव्हरसोबत बाजारपेठेशी संबंधित योजनांचा लाभ घेऊ शकतात, यामध्ये त्यांना संपत्ती निर्माण करण्याच्या संधींबरोबरीनेच आर्थिक सुरक्षा असे दुहेरी लाभ मिळतात. यामध्ये पीआर प्रो , पीआर एलिट इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये प्रीमियम भरणा आणि भरणा करण्याचा कालावधी यांचे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय ग्राहक आपल्या गुंतवणूक आवश्यकतांनुसार सिस्टिमॅटिक विथड्रॉवल सारख्या पर्यायांचा देखील लाभ घेऊ शकतील.