NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

त्यांना हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ आहे, पण.. भुजबळ कोणावर भडकले ?

0

नाशिक : मी मुंबई  महापालिका सांभाळली आहे, कोणाचे काय काम हे मला चांगले माहीत आहे. अधिकारी काम करत नसतील तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो, असा थेट इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. सध्याचे अधिकारी खूप बिझी झालेत. मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे, पण येथे पाहणीसाठी येण्यासाठी वेळ नाही, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. 

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शनिवारी द्वारका चौक परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिका, वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकाऱ्यांना खरमरीत शब्दांत सुनावल्याचे दिसून आले. भुजबळ यांनी मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात, सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहेत. याबाबत विचारणा केली असता मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे आमचे काम नाही, असे उत्तर दिले. मनपा अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर छगन भुजबळ चांगलेच संतापले.

Leave A Reply

Your email address will not be published.