नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार यांनी आज स्वतंत्र मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन केले. अजित पवारांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास पक्षाचे बहुसंख्य आमदार उपस्थित आहेत. नाशिक जिल्ह्यातील पाच आमदार अजित पवार यांच्यसमवेत असून देवळलीस्थित आमदार सरोज आहिरे प्रकृतीचे कारण देत मुंबईत गेलेल्या नाहीत.
अजित पवारांनी एमईटी सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. यावेळी तीसहून अधिक आमदार उपस्थित आहेत. नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार हे पाच आमदार यावेळी उपस्थित आहेत. याशिवाय माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अजितदादा यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.