नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
सामनगाव रोड येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळब उडाली आहे. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक पिकअप व स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसत आहे. पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लांबविली, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.