NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जीएसटी चोरीवर आता ईडी कारवाईचा उतारा; मनी लाँड्रिंगचा गुन्हा..

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

जीएसटी चोरीतील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांत जीएसटीमध्ये गडबड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यात खूप मोठी रक्कम लपविल्याचे उघड झाले आहे. सरकारच्या या पावलामुळे मनी लाँड्रिंगद्वारे जीएसटी चोरी वसूल करण्यास मदत होणार आहे. 

भारतात GSTN इनडायरेक्ट टॅक्सचे तंत्रज्ञान हाताळते. यासोबतच रिटर्न, कर भरण्याचे तपशील आणि सर्व GST संबंधित माहिती GSTN संग्रहित करते. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (PMLA), 2002 च्या तरतुदीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ईडी ज्यांच्याशी माहिती शेअर करेल अशा संस्थांमध्ये जीएसटीएनचा समावेश करण्यात आला आहे.  GSTN ला PMLA अंतर्गत अधिसूचित केल्याने मोठ्या कर चुकवणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आणि त्यांना कर थकबाकी भरण्यास भाग पाडण्यासाठी कायदेशीर चौकट तयार होईल, अशी माहिती AMRG आणि असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांनी दिली. जीएसटी कायद्यांतर्गत तपास, निर्णय आणि करांची वसुली सुरू करण्यासाठी जीएसटीएन संभाव्य कर गुन्हेगारांबद्दल संबंधित माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊ शकते, असेही ते म्हणाले. 

Leave A Reply

Your email address will not be published.