मुंबई/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो. आता याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार सुरू करणार आहे. याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर देखील करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1997 मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. दरम्यान, उद्योग रत्न पुरस्काराचे स्वरुप कसे असेल? याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. त्याला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. ते आजही टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.