NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

रौद्ररुपी ‘बिपरजॉय’ गुजरातला धडकणार; ५० हजार जणांचे स्थलांतर..!

0

 गांधीनगर/एनजीएन नेटवर्क

अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने उत्तर-पश्चिम मार्गाने पुढे सरकत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे येणाऱ्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचण्याची, पूर येण्याची आणि किनाऱ्यालगत भरतीमुळं उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे आतापर्यंत 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भुज आणि कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तिव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. सौराष्ट्र-कच्छ भागात सोसाट्याच्या वारा सुटलाय, त्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले होते. आतापर्यंत 50 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेय. 

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून जाण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ताशी 125 ते 135 किलोमीटर वाऱ्याच्या वेगासह जमिनीवर धडकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं कच्ची घरं आणि बांधकामं कोसळू शकतात, झाडं पडू शकतात आणि वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची चिन्हं आहेत. मुसळधार पावसाचा रस्ते, दळणवळण आणि कनेक्टिव्हिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.