चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळ असणाऱ्या सोग्रस येथे छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवल्याने एकाचा मृत्यू झाला तर तेरा विद्यार्थी जखमी झाले. शाळा सुटल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडताना हा अपघात झाला. अक्षय रमेश महाले ( रा. भूत्याने , ता. चांदवड ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केल्याने महामार्गावर वाहनांच्या काही किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
प्राप्त माहितीनुसार, चांदवडजवळ असणाऱ्या सोग्रसमध्ये शाळा सुटल्यानंतर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहनाने शाळकरी मुलांना धडक दिली. या अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातात अपघातात बारा ते तेरा विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमींना चांदवड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येवून उपचार सुरु आहेत. अपघाताची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. यावेळी महामार्गावर ठाण मांडून त्यांनी रस्ता रोको केले. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, अपघातावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिकहून मालेगावकडे जात होते. मात्र अपघाताची माहिती मिळताच त्यांनी चांदवड येथे शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि वाहन चालकावर कडक कारवाईचे आदेश दिले. सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने केला जाईल. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना शासनाच्या वतीने चार लाख रुपये मदत देण्याची घोषणी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे भुसे म्हणाले.
Comments are closed.