त्र्यंबकेश्वर : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात संघटन पर्व अभियान राबविले त्या अंतर्गत मंडल, जिल्हा व प्रदेश अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.त्याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी तेजस ढेरगे यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली त्यामध्ये त्र्यंबकेश्वर शहराचे अध्यक्षपदी तेजस ढेरेगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 1999 पासून पक्षामध्ये कार्यरत असणारे ढेरगे हे 2005 ते 2009 भाजपा युवा मोर्चाची त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी संभाळली होती. संघटनात्मक कार्यक्रम,उपक्रम व अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. पक्षाप्रति असलेली निष्ठा, सामाजिक कामाची आवड, संघटन कौशल्य,जनसंपर्क, जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री,प्रशासन अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, गावाकरी यांचा समन्वय साधने ही महत्वपूर्ण भूमिका ते निभवतील या सर्व बाबी त्यांच्या निवडीमध्ये जमेच्या ठरल्या, असे यावेळी तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकी पूर्वी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणी अधिक जोमाने करून वरिष्ठांनी दाखवलेला विश्वासाला सार्थ ठरवू असे नवनिर्वाचित शहराध्यक्ष तेजस ढेरगे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर शहरातील विविध संस्था, सामाजिक राजकीय शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व विशेषता युवकांकडून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातून जिल्हा कार्यकारणीवर निवड झालेले पदाधिकारी :
- इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा प्रभारीपदी सुनिल अडसरे,
- जिल्हा उपाध्यक्ष पदी रवींद्र सोनवणे,कैलास घुले,
- जिल्हा चिटणीस पदी कमलेश जोशी,
- आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्षपदी बेझे चाकोरे येथील सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज
- तीर्थ विकास आघाडी जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब दीक्षित,
- आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विष्णू दोबाडे
- ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी कैलास पाटील,
- प्रज्ञावंत आघाडी जिल्हाध्यक्षपदी पंकज धारणे,
- राजस्थानी प्रकोष्ट जिल्हा संयोजक पदी राजेश श्रीमाळी
- जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी सुयोग शिखरे,राजाराम चव्हाण, संकेत टोके, तृप्ती धारणे
- विशेष कायम निमंत्रित सदस्य :
ज्येष्ठ नेते एडवोकेट श्रीकांत गायधनी, निवृत्ती लांबे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुचिता शिखरे, प्रशांत गायधनी, मा. जिल्हा परिषद सदस्य शकुंतला डगळे
Comments are closed.