NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

टीना अंबानी यांची ‘ईडी’कडून चौकशी; जाणून घ्या, काय आहे प्रकरण?

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

अभिनेत्री आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांची मंगळवारी ईडीने चौकशी केली. परकीय चलन कायद्याच्या अर्थात ‘फेमा’च्या कथित उल्लंघनप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

 सोमवारी याच प्रकरणात अनिल अंबानी यांचाही ईडीकडून जबाब नोंदवण्यात आला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ईडी अंबानीं दांपत्याना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावू शकते. यापूर्वी 2020 साली येस बँक प्रकरणात ईडीने अनिल अंबानींची चौकशी केली होती. अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी ईडीसमोर हजर झालेल्या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार अंबानी दाम्पत्याविरुद्धचा तपास परदेशात अघोषित संपत्ती आणि पैशांच्या व्यवहाराशी संबंधित आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, आयकर विभागाने अनिल अंबानी यांना काळा पैसा विरोधी कायद्यांतर्गत दोन स्विस बँक खात्यांमध्ये जमा केलेल्या 814 कोटी रुपयांच्या अज्ञात रकमेवर 420 कोटी रुपयांची करचोरी केल्याबद्दल नोटीस बजावली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अंबानी याना दिलासा देत त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.