मुंबई/एनजीएन नेटवर्क
बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 15 जणांच्या चमूची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला जात असल्याने टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे.
टीम इंडिया प्रबळ दावेदार म्हणून वर्ल्डकपमध्ये उतरणार आहे. सलामीवीर रोहित शर्माकडे टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल आणि इशान किशन यांचा विकेटकीपर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचा अनुभवी स्पिनर युझवेंद्र चहलचे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. गेल्या वर्ल्डकपमध्येही चहलला टीममध्ये संधी देण्यात आली नव्हती. चहलसोबत आर अश्विनला देखील वर्ल्डकपच्या टीमचा भाग बनवण्यात आलेले नाही. उत्तम स्पिनर म्हणून अश्विनचे नाव घेतले जाते, मात्र वर्ल्डकपसाठी त्याच्या नावाचा विचार केलेला नाही.
भारतीय संघ असा :
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.