NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

शिक्षकाचे काळेकृत्य ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; फोटो व्हायरल..

0

 अहमदनगर/एनजीएन नेटवर्क

जिल्ह्यातील जामखेड शहरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉजवर अत्याचार केले.

प्राप्त माहितीनुसार, शिक्षकाने आपल्याच शाळेतीत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचे सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. यावरुन तिच्याशी अश्लिल बोलू लागला. तिला अर्धनग्न फोटो पाठवण्यासाठी सांगू लागला. हे फोटो त्याच्या हाती लागताच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.

पोलिसांनी मुसक्या आवळल्या

या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे. पालकांनी या घटनेनंतर शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर आसे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.