मुंबई : भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या व्हाट्सअप प्लॅटफॉर्मवर प्रीमियम पेमेंट सेवा सुरु केली आहे. जीवन विमा उद्योगक्षेत्रात अशाप्रकारची सेवा सुरु करणारी टाटा एआयए ही पहिली कंपनी आहे. आधी व्हाट्सअपवर फक्त युपीआयवर आधारित व्यवहारच होऊ शकत होते, पण आता टाटा एआयएचे ग्राहक व्हाट्सअपमध्ये विविध पेमेंट पद्धतींचा उपयोग करू शकतील. टाटा एआयएच्या पॉलिसीधारकांना व्हाट्सअपवर रिन्यूअल पेमेंट्ससाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग पर्यायांचा वापर करता येईल. प्रीमियम भरणा करण्यासाठी आधीची २ लाख रुपयांची मर्यादा वाढवून १ कोटी रुपये करण्यात आली आहे.
जून २०२३ मध्ये टाटा एआयएने जीवन विमा उद्योगक्षेत्रात सर्वात पहिल्यांदा डिजिटल पेमेंट्सची सुरुवात करून व्हाट्सअप व युपीआय-सक्षम पेमेंट पर्यायांमार्फत प्रीमियम पेमेंट तातडीने करण्याची सुविधा उपलब्ध करवून दिली. टाटा एआयएने आपल्या ग्राहकांसाठी व्हाट्सअपवर एकूण २७ सेवा उपलब्ध करवून दिल्या आहेत. पॉलिसी कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपीज, प्रीमियम सर्टिफिकेट, क्लेम्स इनिशिएशन आणि अपडेट्स, रिन्यूअल प्रीमियम पेमेंट्स, संपर्क माहिती अद्ययावत करणे, सेवा विनंतीवरील कार्यवाही कुठवर आली आहे ते समजून घेणे, एनईएफटी अपडेट, युनिट स्टेटमेंट आणि फंड व्हॅल्यू अपडेट्स इत्यादींचा समावेश आहे. कंपनीने ताशा (TASHA) हे इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस बोट देखील कार्यान्वित केले असून ते ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी दिवसाचे २४ तास आणि आठवड्यातील ७ दिवस उपलब्ध असते.
टाटा एआयएचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ ऑपरेशन श्री संजय अरोरा यांनी यावेळी सांगितले,
“ग्राहकांना सहज वापरता येतील असे अतिशय सुविधाजनक, नवे पेमेंट पर्याय व्हाट्सअपवर उपलब्ध करवून देऊन
विमा उद्योगक्षेत्रात नवा ट्रेंड सेट करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत ग्राहकांना सुविधा पुरवण्याच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भविष्यात देखील आम्ही अशाच प्रकारच्या, उद्योगक्षेत्रात आघाडीच्या ठरतील अशा सुविधा उपलब्ध करवून देत राहू, ज्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा अनुभव मिळत राहील.”